नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र धनुर्वीद्या संघटने अंतर्गत सांगली जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतिने दिनांक 8 ते 10 एप्रील दरम्यान कुपवाड सांगली येथे आयोजीत २० व्या सब ज्युनियर धनुर्वीघा स्पर्धेसाठी नांदेड जिल्हयाच्या संघाची निवड दिनांक २ एप्रील रोजी आर्चरी स्कुल श्री गुरू गोविंदसिघजी स्टेडीयम नांदेड येथे सकाळी 7 वाजता आयोजीत करण्यान आली असल्याचे निवड समिती प्रमुख तथा सचिव वृषाली पाटील जोगदंड यांनी कळविले आहे . महाराष्ट्र धनुर्वीघा संघटने अंतर्गत सांगली जिल्हा आर्चरी संघटनेच्या वतिने नवकृष्णा व्हॅली कुपवाड एमआयडीसी सांगली येथे आयोजीत २० व्या राज्यस्तर सबज्युनियर स्पर्धेसाठी इंडीयन, रिकव्हर, व कंम्पाउंड प्रकारात मुलांचे व मुलींचे संघ निवडण्यात येणार असून त्यामधे 1 जानेवारी 2005 व त्यानेतर जन्मलेले खेळाडू सहभागी होतील . राज्यस्तरासाठी प्रत्येकी प्रकारात सहा खेळाडूची निवड करण्यात येणार असुन राज्यस्तरावर सहभागी सर्व खेळाडूंना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येतील. तरी जिल्ह्मातील ईच्छुक खेळाडूंनी 2 एप्रील रोजी सकाळी 7 वाजता आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व आपआपले इक्यूपमेन्ट सह उपस्थीत रहाण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, कार्याध्यक्ष डॉ . हंसराज वैध, स्टेडीयम व्यवस्थापक रमेश चवरे, व राष्ट्रीय प्रशिक्षीका तथा निवड समिती प्रमुख् वृषाली पाटील जोगदंड यांनी केले आहे.
