नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जबरी चोरी झाली आहे. मौजे वझर ता.देगलूर येथे एक घर फोडण्यात आले आहे. किनवट शहरात एक दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व टी.व्ही. चोरला आहे. याशिवाय जवळपास 7 दुचाकी गाड्यांच्या नोंदी पोलीस दप्तरी दाखल आहेत.
संजय रामचंद्र कुलकर्णी हे छायाचित्र व्यवसायीक आहेत. त्यांची गोपाळनगर, शिवाजीनगरमध्ये सचिन डिजिटल नावाची दुकान आहे. 1 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेच्यासुमारास ते काम करत असतांना तीन अनोळखी लोकांनी त्यांना खंजीरचा धाक दाखवून त्यांचा एक कॅमेरा, रोख रक्कम, मोबाईल असा 24 हजार 800 ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक भगवान सावंत अधिक तपास करीत आहेत.
तानाजी सोपानराव लवटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 मार्चच्या सकाळी 10 ते 1 मार्चच्या पहाटे 6 वाजेदरम्यान ते आणि त्यांचे कुटूंबिय मौजे वझर ता.देगलूर येथील त्यांच्या घराच्या पाठीमागे झोपले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी पेटीमधील रोख रक्कम आणि दागिणे असा 55 हजारांचा ऐवज चोरून नेला. मरखेल पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मधुकर जायभाये अधिक तपास करीत आहेत.
रामराव व्यंकटराव पातानीवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची किनवट शहरातील बसस्थानकासमोर श्रीराम फर्टिलायझर नावाची दुकान आहे. 31 मार्चच्या सकाळी 6 ते 1 एप्रिलच्या पहाटे 6 वाजेदरम्यान या दुकानाचे शटर उचकवून कोणी तरी चोरट्यांनी त्यात असलेला एक जुना टी.व्ही. आणि 9 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार दोनकलवार अधिक तपास करीत आहेत.
यासोबतच पोलीस दप्तरी मागिल 24 तासामध्ये 6 ते 7 दुचाकी गाड्या चोरीला गेल्याच्या घटना नोंद करण्यात आल्या आहेत. अनेक दुचाकी चोर नांदेड जिल्हा पोलीसांनी तुरूंगात पाठवले तरीपण नवीन चोर तयार होत असून दुचाकी चोरीचा प्रकार घडतच आहे.
छायाचित्रकाराची लुट, वझरमध्ये घर फोडले, किनवटमध्ये दुकान फोडले