नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेचा हात पकडून तिला माझ्यासोबत चल म्हणणाऱ्या युवकाविरुध्द वजिराबाद पोलीसांनी पोक्सो गुन्हा दाखल केला आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिला चार मुली आहेत, त्यांच्या पतीचे निधन 2020 मध्ये झाले आहे आणि त्या स्वत:च आपल्या मुलींचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी काम करतात. 28 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता त्या कामाला गेल्या तेंव्हा विक्रमसिंग हरजितसिंग जाधव या युवकाने त्यांच्या 15 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेला हात धरला आणि चल मी तुला फिरवून आणतो असे म्हणाला. विक्रमसिंग हा अल्पवयीन बालिकेचा पाठलाग ती शाळेत जातांना सुध्दा करत होता. बालिकेने घटनाक्रम मी आईला सांगेल असे सांगितल्यानंतर त्याने तिला जिवे मारुन टाकण्याची धमकी दिली असा पोलीस प्राथमिकीचा मजकुर आहे.
या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 97/2022 विक्रमसिंग हरजितसिंग जाधव विरुध्द दाखल केला आहे. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 354, 354(ड), 506 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याचे कलम 12 जोडण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सुरजितसिंघ माळी हे करीत आहेत.