नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील गोकुळनगर भागात ऑईल शोरुम फोडून चोरट्यांनी 10 ते 15 हजार रुपये रक्कम चोरील आहे. कासराळी ता.बिलोली येथील 70 हजार रुपये किंमतीचे दोन बैल चोरीला गेले आहेत. मुखेड येथे 200 फुट वायर चोरून नेणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात आले आहे. नांदेड शहरातील वजिराबाद आणि नांदेड ग्रामीण या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
विष्णु विनायकराव चन्नावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गोकुळनगर भागातील त्यांचे महालक्ष्मी आईल शोरुम 2 एप्रिलच्या सकाळी 4 ते 15 या वेळेत कोणी तरी चोरट्यांनी फोडले आणि गल्यातील 10 ते 15 हजार रुपये चोरून नेले. शिवाजीनगर पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार गायकवाड हे करीत आहेत.
कासराळी येथील लक्ष्मण गंगाराम शिंतोडे यांच्या शेतात बांधलेले 70 हजार रुपये किंमतीचे दोन बैल 1-2 एप्रिलच्या रात्री कोणी तरी चोरून नेले आहेत. बिलोली पोलींसानी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.
मुखेड शहरातील जयमहाकाली पेट्रोल पंपाच्या शेजारी पाणी पुरवणाऱ्या मोटारचे 200 फुट वायर 10 हजार रुपये किंमतीचे चोरून नेतांना दोन जणांना पकडले. लक्ष्मण विठ्ठल श्रीरामे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुखेड पेालीसंानी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
दयानंद रत्नसिंग राठोड यांची 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी वाडेकर हॉस्पीटल समोरून 1 एप्रिलला चोरीला गेली. त्याबाबतचा गुन्हा वजिराबाद पोलीसांनी दाखल केलेला आहे. पोलीस अंमलदार वाजिद अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रविनगर बाजार हडको येथून शिवराज दत्ता तोशटवार यांची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.