नांदेड(प्रतिनिधी)- आज सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास सांगवी पुलाजवळ दुचाकीस्वार महिलेच्या पायावरून ट्रक गेला. जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने महिलेच्या पतीला छोटासाही मार लागलेला नाही.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार सरोजा आणि भगवानराव देवकर हे पती-पत्नी पाचलेगाव ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी आहेत. ते सांगवी पुलावरून पलिकडे अर्धापूर रस्त्यावर जात असतांना सांगवी पुलावर एका ट्रकने त्या महिलेला दिलेल्या धडकेत महिलाखाली पडली आणि तिच्या डाव्या पायावरून ट्रकचे टायर गेले. अपघातात त्या महिलेचा संपुर्ण पाय निकामी झाला असल्याची शक्यता प्रत्यक्ष दर्शीनी व्यक्त केली. त्वरीतप्रभावाने महिलेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात पती भगवानराव देवकर पुर्णपणे सुरक्षीत आहेत. घटनेची माहिती मिळताच विमानतळचे पोलीस उपनिरिक्षक एकनाथरावजी देवके साहेब तेथे आपल्या अंमलदारांसह पोहचले आणि अपघात करणारा ट्रक ताब्यात घेतला आहे.