नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरात अनेक ठिकाणी झालेल्या चोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 10 लाख 3 हजार 118 रुपयंाचा ऐवज चोरीला गेला आहे. धावरी ता.भोकर येथे 41 हजार रुपयांची चोरी झाली आहे. तहसील कार्यालय भोकर मधील एका तलाठी सज्जा कार्यालयाला फोडून चोरट्यांनी 30 हजारांचा ऐवज लांबवला आहे आणि तसेच अर्धापूर आणि नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
लोहा येथील हनुमंत बळवंत लांडगे यांची मोबाईल शॉपी फोडण्यात आली. तसेच त्यांच्या शेजारील साई मोबाईल शॉपी फोडण्यात आली, एसबीआय ग्राहसेवा केंद्र तोडण्यात आले. त्यात लांडगे यांच्या मोबाईल शॉपीमधून 6 लाख 90 हजार 860, ग्राहसेवा केंद्रातून 75 हजार रुपये किंमतीचा मोबाईल तसेच ब्लुटूथ हेडफोन 1 लाख 5 हजार 338 रुपयांचे अनूप मोबाईलमधील 15 मोबाईल 2 लाख 6 हजार 920 रुपयांचे असा एकूण 10 लाख 3 हजार 118 रुपयांचा ऐवज चोरला आहे या सर्व अनेक चोऱ्यांचा एकच गुन्हा लोहा पोलीसंानी दाखल केला आहे.
लोहा येथे अनेक दुकाने फोडून 10 लाखांचा ऐवज चोरला