देशद्रोही किरीट सोमय्याविरुद्ध शिवसेना रस्त्यावर; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, नांदेडमध्ये प्रतीकात्मक पुतळा जाळला

नांदेड,(प्रतिनिधी)- आयएनएस विक्रांत या युद्धनौकेला वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा किरीट सोमय्याने घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित तुरुंगात टाकण्यात यावे या मागणीसाठी गुरुवार दि. सात एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहरातील आरटीआय परिसरातील म.फुले पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी सोमय्या घ्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

 

नांदेड जिल्ह्यातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या वतीने महात्मा फुले पुतळा आयटीआय चौक नांदेड येथे किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडे मारून सकाळी दहन करण्यात आले. तसेच किरीट सोमय्या विरुद्ध घोषणाबाजी करत पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. हे आंदोलन जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, खासदार हेमंत पाटील आणि नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद पाटील बोंढारकर, उमेश मुंडे, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, लोकसभा संघटक डॉ. मनोजराज भंडारी, शिवसेना जिल्हासंघटक दयाल गिरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश मोरे, गंगाधर बडुरे, शिवसेना महानगरप्रमुख अशोक उमरेकर, शिवसेना शहरप्रमुख तुलजेश यादव, सचिन किसवे, गजानन राजुरवार, माधव बिल्लेवाड, शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे, जयवंत कदम, अमोल पवार, सुरेश पाटील हिलाल, परमेश्वर जाधव, संजय पाटील कुरे, संतोष कपाटे, युवासेना सहसचिव माधव पावडे, शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, युवासेना जिल्हा युवाधिकारी व्यंकटेश मामिलवाड, गजानन कदम, जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पावडे, बाबुराव वाघ, शिवसेना तालुकासंघटक नवनाथ काकडे, बालाजी भायेगावकर, महिला आघाडीच्या निकिता शाहापुरवाड, दिपाली उदावंत, साहेबराव मामिलवाड, बळवंत तेलंग, स.दर्शनसिंघ सिध्दु, रमेश पाटील कोकाटे, प्रकाश जोंधळे, श्याम पाटील वानखेडे, श्याम बन, प्रणव बोडके, दिगंबर कल्याणकर, आनंद जाधव, शैलेश राऊत, गौरव कोटगिरे, उमेश दिघे, पिंटू सुनपे, साई विभुते, सचिन कल्याणकर, दिगंबर बाबर, धनंजय पावडे, कैलास कल्याणकर, मुन्ना राठौर, राजू मोरे, राजू गुंडावार, कोरचन यादव, नितिन सरोदे, गजानन हारकरे, स. नवजितसिंघ गाडीवाले, अशोक पावडे, गंगाधर कोकाटे, आकाश कोकाटे, बाळु शिंदे, गजानन पवार, विठ्ठल कुंडे, रवी कोकाटे, साहेबराव वानखेडे, बंडू पेंटर, मनमत स्वामी यांच्यासह आदी शिवसेनेचे आजी- माजी पदाधिकारी व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *