नांदेडमध्ये पुन्हा फायरिंग; पण ही फायरिंग पोलीसांनी केली

नांदेड(प्रतिनिधी)-फायरिंगच्या कारणावरुन आज नांदेड पुन्हा एकदा चर्चेत आले. पण आजची फायरींग अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड साहेबांनी केलेली आहे. कौठा येथील एका युवकाच्या घरात थेट गेल्यानंतर झालेल्या बाचा बाचीनंतर साहेबांनी फायरिंग केल्याची चर्चा कौठा परिसरात होत आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास कौठा परिसरातील  बावरी यांच्या घरात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस पथक आपले प्रमुख श्री.अशोकरावजी घोरबांड यांच्यासोबत गेले. कौठा परिसरातील लोक सांगतात आत काय झाले हे माहित नाही. पण फायरिंगचा आवाज आला. यानंतर पोलीस सांगत आहेत की,  बावरीने पोलीसांवर हल्ला केला आणि त्यावर फायरिंग करण्यात आली. अशोकरावजी घोरबांड यांनी केलेल्या फायरिंगमध्ये बावरी हा जखमी झाला आहे. व्हॉटसऍप या संकेतस्थळावर व्हायरल होत असणाऱ्या शब्दांप्रमाणे  बावरीने तलवार घेवून पोलीसांवर हल्ला केला.  बावरीच्या पायावर गोळी लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. व्हाटसऍप संकेतस्थळावर फिरणाऱ्या संदेशानुसार पोलीस आपल्या दिशेने येत आहेत या भितीने  बावरीने पोलीस गाडीची काच फोडली आणि तलवार फिरवली म्हणे त्यात नांदेड ग्रामीण पेालीस ठाण्यातील अत्यंत जबरदस्त पोलीस अंमलदार शिवाजीरावजी पाटील हे जखमी झाले आहेत. आपल्यावर हल्ला चढण्याआधीच श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांनी आपल्या पिस्तुलातून फायरींग केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *