जनतेने 10 एप्रिल रोजी पर्यायी मार्गांचा वापर करावा-प्रमोद शेवाळे

रामनवमीनिमित्त शहरातील वाहतुक मार्गात बदल
नांदेड(प्रतिनिधी)-10 एप्रिल रोजी साजरा होणारा रामनवमी उत्सवाच्या संदर्भाने पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी शहरातील कांही मार्ग वाहतूकीसाठी पुर्णपणे बंद केले आहेत. आणि कांही पर्यायी मार्ग सुचवले आहेत. हा आदेश 10 एप्रिलच्या सकाळी 8 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहणार आहे.
10 एप्रिल रोजी रामनवमी उत्सव आहे. भगवान श्री रामाची शोभा यात्रा, मिरवणूक निघणार आहे. मिरवणूकीला अडचण नको आणि जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास नको या संदर्भाचा विचार करून शहरातील कांही मार्ग पुर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तसेच कांही पर्यायी वाहतुक मार्ग सुचविण्यात आले आहेत. सर्वसामान्य जनतेने या पर्यायी मार्गाचा आपल्या प्रवासासाठी उपयोग करावा असे आवाहन पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले आहे.
वाहतुकीकरीता पुर्णपणे बंद करण्यात आलेले मार्ग
जुना मोंढा देना बॅंक, महाविर चौक, तरोडेकर मार्केट, वजिराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर ते आयटीआय चौक श्रीनगर, वर्कशॉप कॉर्नरपर्यंत जाण्यास पुर्णपणे बंदी आहे. वर्कशॉप टी पॉईंट , श्रीनगर ते आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद चौककडे येण्यास पुर्णपणे रस्ता बंद राहिल. चिखलवाडी ते महाविर चौकाकडे येणारा रस्ता पुर्णपणे बंद राहिल. सिडको-हडको तसेच लातूर फाटा भागातून नांदेड शहराकडे नावघाट पुलावरून इतवारा भागात व नवीन पुलावरून जुना मोंढा भागात येणारी वाहतुक पुर्णपणे बंद राहिल.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग
वजिरबाद चौकाकडून श्रीनगर, वर्कशॉपकडे जाणारी वाहतुक तिरंगा चौक्, पोलीस मुख्यालय, खडकपुरा, लालवाडी अंडर ब्रिज, शिवाजीनगर, पिवळीगिरणी, गणेशनगर वायपॉईंटकडे जाण्यास-येण्यास हा मार्ग सुरू राहिल. राजकॉर्नर ते जुना मोंढा भागावरील वाहतुक राजकॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर, आनंद नगर, नाईक चौक, महाराणा प्रताप चौक या मार्गावरुन जाण्या-येण्यासाठी सुरू राहिल. नाईक चौक, अण्णाभाऊ साठे चौक, चिखलवाडी कॉर्नर, गुरूद्वारा हनुमान मंदिर ते जुना मोंढा हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू राहिल. गोवर्धनघाट पुलावरून नांदेड शहरात येणारी वाहतुक तिरंगा चौक, पोलीस मुख्यालय, लालवडी अंडरब्रिज, गणेशनगर वायपॉईंटकडे जाण्या-येण्यासाठभ हा रस्ता सुरू राहिल. लातूर फाटा, सिडको, हडको, लोहा, ढवळे कॉर्नर, चंदासिंग कॉर्नर, धनेगाव चौक, वाजेगाव, जुना पुल, देगलूर नाका, रजा चौक मार्गे माळटेकडी हा रस्ता जाण्या-येण्यासाठी सुरू राहिल.
रामनवमी निमित्त निघणाऱ्या मिरवणूकीच्या संदर्भाने वाहतुक मार्गांमधील हा बदल 10 एप्रिल रोजी सकाळी 8 ते रात्री 12 वाजेदरम्यान कायम राहिल. जनतेने आपल्या सोयीनुसार सुचविण्यात आलेल्या पर्याय मार्गांचा उपयोग करून आपली कामे करावीत असे आवाहन पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *