एका महिलेसह पाच जण भारतीय हत्यार कायदयाच्या कचाट्यात

नांदेड,(प्रतिनिधी)- सामाजिक संकेतस्थळांवर हत्यारांसह फोटो,व्हिडीओ अपलोड नका अश्या आशयाचे वृत्त वास्तव न्यूज लाईव्हने ८ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध केले होते.पण जागृती करण्यात काहीतरी कमतरता राहिली.
पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिलेल्या सूचनांच्या आधारावर रामनवमीच्या आदल्या रात्री इतवारा पोलिसांनी पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे,पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक शेख असद,पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर कलंदर,हबीब चाऊस,माही दासरवाड,नरहरी कस्तुरे,शेख समीर,नजरे आझम यांनी रात्रभर जागून ६ तलवारी, २ खंजर, ३ कत्या आणि १ कट्टा असा हत्यार साठा पकडला.सोबतच गजानन बालाजीराव मामिलवाड (४०),नरसिंग उर्फ पिंटू लक्ष्मणराव माळवतकर (३२), आकाश बंडूराव शिंदे (२७), साहिल मदनसिंह ठाकूर (२०),जयश्री मदनसिंह ठाकूर (४०),सर्व रा, सिद्धनाथपुरी शंकर आचार्य यांच्या मठाजवळ नांदेड, यांना हत्यारांसह पकडण्यात आले.

महिलेसह पाच जणांवर भारतीय हत्यार कायद्या प्रमाणे गुन्हे क्रमांक ७०,७१, आणि ७२/२०२२ दाखल करण्यात आले आहेत.या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक स्वामी,उप निरीक्षक गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.आता तरी युवकांनी,पुरुषांनी आपले फोटो हत्यारांसह सामाजिक संकेतस्थळांवर अपलोड करू नये.नांदेड जिल्हा पोलीस अत्यंत बारकाईने अश्या प्रकारच्या घटनांवर लक्ष ठेवून आहे.
