नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय शिक्षणातील जनक महात्मा ज्योतीबा फुले यांची पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
11 एप्रिल ही महात्मा ज्योतीबा फुले यांचा जयंती दिन. पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ.अश्र्विनी जगताप, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे तसेच अनेक शाखाचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी या जयंती समारंभात मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक उत्तम वाघमारे, सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर यांनी चांगल्याप्रकारे केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात महात्मा फुले जयंती साजरी