नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील अत्यंत कर्तबगार, नदी पाहणी निरिक्षणात अत्यंत तरबेज असलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भानुदास वडजे पाटील यांनी एक गावठी कट्टा पकडला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भानुदास वडजे पाटील आणि त्यांचे सहकारी 10 एप्रिल रोजी दुपारी गोशाळा शनि मंदिरजवळ गस्त करत असतांना साईनाथ फकीरा पवार (24) याच्याकडे एक 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा त्यांनी पकडला आहे. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी साईनाथ फकीरा पवारविरुध्द गुन्हा क्रमांक 106/2022 कलम 3/25 भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्या तपास वजिराबाद पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्याकडे देण्यात आला आहे.