देगलूरमध्ये घर फोडले, भोकर येथे चोरी, दोन दुचाकी चोरी, पाच वासरांची चोरी, मनुके चोरी

नांदेड(प्रतिनिधी)- देगलूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. मौजे लोहगाव ता.बिलोली येथील एका घरातून 50 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आलेली आहे. इतवारा, नांदेड ग्रामीण येथे दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. लोहा येथून उभ्या मालवाहतुक गाडीतून मनुका चोरण्यात आला आहे. भोकर येथे जनावर चोरी झाली आहेत. हसनार ता.मुखेड या गावातून दोन बैल चोरीला गेले आहेत.

विनोद पांडूरंग नाईक यांचे कृपा विद्यानगर देगलूर येथे घर आहे. 11 एप्रिलच्या दुपारी 1.30 ते 3.15 यावेळेदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 47 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मोरे अधिक तपास करीत आहेत.

लोहगाव येथील शेषाबाई सुरेश कांबळे ह्या 8 एप्रिल रोजी रात्री आपल्या कुटूंबासह झोपली गेल्यानंतर कोणी तरी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून गादीच्या खोळमध्ये ठेवलेले 50 हजार रुपये रोख चोरून नेले आहेत. रामतिर्थ पोलीसंानी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार पठाण हे करीत आहेत.

इतवारा आणि नांदेड ग्रामीण या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 45 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. याबाबत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भोकर येथील विठ्ठल गंगाराम चव्हाण यांचे 3 वासरू 20 हजार रुपये किंमतीचे 7 एप्रिलच्या रात्री 1 ते पहाटे 5 वाजेदरम्यान चोरीला गेले आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पांढरे अधिक तपास करीत आहेत.

हसनार पदे ता.मुखेड या गावातील बालाजी मारोती नाईक यांचे दोन बैल 7 -8 एप्रिलच्या रात्री चोरीला गेले आहेत. यांची किंमत तक्रारीत लिहिलेले नाही. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार पांडे अधिक तपास करीत आहेत.

लोहा येथे उभ्या असलेल्या एका चार चाकी माल वाहतुक गाडीची ताडपत्री काढून चोरट्यांनी त्यातून 35 हजार रुपये किंमतीचे मनुका बॉक्स चोरुन नेले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *