
नांदेड,(प्रतिनिधी)- पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात नांदेड पोलिसांनी काल १२ एप्रिलच्या रात्री शहरातील अनेक भागांमध्ये केलेल्या कार्यवाहीत १९ दुचाकी वाहनांवर केसेस करून ३५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.तसेच ११ वाहने जप्त केली आहेत.
काल १२ एप्रिलच्या रात्री अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार रस्त्यावर
होते. रात्रीच्या अंधारात आपल्या ,मर्जीने गाडी चालवता येते असा समज असणारी मंडळी अश्या वेळेचा सदुपयोग घेत असते. पण सध्या पोलिसांचे ‘इप्सित’ प्राप्त करण्यात यश आलेले नाही. त्यासाठीच नवीन मेहनत पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना करावी लागत आहे. पोलिसांनी रात्रीच्या अंधारात तीन दुचाकी स्वार असलेली वाहने थांबवली,अत्यंत भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्यांना रोखले,ज्यांच्या कडे वाहन चालवण्याचा परवाना नाही अश्या दुचाकी गाडयांना रोखले. अश्या एकूण १९ दुचाकी वाहनांवर मोटार वाहन कायद्या प्रमाणे केसेस करून त्यांच्या कडून ३५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.तसेच ज्या वाहन चालकांनी वाहनांची कागदपत्रे दाखवण्यात असमर्थ ठरले अशी ११ दुचाकी वाहने गाडीत टाकून पोलिसांनी जप्त केली आहेत.एकूण ३० गाड्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे.


अश्याच पद्धतीने इतवारा आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारांची घरे तपासण्यात आली.पोलिसांच्या अभिलेखावर असलेले आरोपी आपल्या घरीच आहेत की नाहीत हे पाहण्यात आले.यावेळी कोणी बावरी पोलीस पथकावर हल्ला करण्याच्या तयारीत समोर आला नाही.त्यामुळे गोळीबार करण्याची गरज पडली नाही.कोणी शिवाजीराव पाटील तलवारीच्या वारने जखमी झाले नाहीत,आणि कोणत्याही पोलीस वाहनावर तलवारीने कोणी मारलेले नाही.त्यामुळे सरकारी रुग्णालयात दुसरी शस्त्रक्रिया करावी लागेल अशी परिस्थिती तयार झालेली नाही.

गोळीबार करून एलसीबी मिळते काय ?
नांदेड ग्रामीणचे तोंडी आदेशावर कार्यरत,अत्यंत खतरनाक पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी बावरीने केलेल्या पोलिसांवरील हल्ल्याला गोळीबाराने दिलेले उत्तर सध्या मोठा चर्चेचा विषय आहे.गोळीबार केल्याने आता तोंडी आदेशाची नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील नियुक्ती पूर्ण होणार आणि पुढील एलसीबीची कायम नियुक्ती मिळणार अशी चर्चा सुरु झालेली आहे.
