नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आदल्या रात्री बिना परवाना देशी दारुचे सहा बॉक्स बाळगणाऱ्याला इतवारा पोलीसांनी पकडले आहे.
बिलालनगर भागात एका व्यक्तीकडे बिना परवाना देशी दारु बाळगलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर इतवाराचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांनी आपल्या सहकारी पोलीसांना तेथे पाठवले. त्या ठिकाणी पोलीसांनी सय्यद साजीद सय्यद ईस्माईल (34) याच्याकडून 6 देशी दारुचे बॉक्स जवळपास 18 हजारांची दारु पकडली आहे. या व्यक्तीविरुध्द इतवारा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
