
नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी नावघाट परिसरात अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांच्या हस्ते अभ्यासीका कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
नावघाट परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते बाली नारायण कांबळे यांनी आपल्या बुध्दवासी आई पुष्पाबाई नारायण कांबळे यांच्या नावे विद्यार्थ्यांसाठी या भागात एक अभ्यासीका तयार केली. या अभ्यासीकेचे उद्घाटन अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ईतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, न्यायाधीश पद्माकर जोंधळे, ज्येष्ठ नागरीक मारोती जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अभ्यासीकेसमोर बोधीवृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलतांना अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे म्हणाले विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या अभ्यासीकेत आज असलेल्या सुविधा त्यांना त्यांच्या अभ्यासातील गरजांप्रमाणे छान आहेत. संयोजकांनी या अभ्यासीकेतील सुविधांना नेहमी अद्यावत करावे जेणे करून आपल्या भागातील विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान प्राप्त करता येईल. उपस्थित लोकांचे आभार बाली कांबळे यांनी व्यक्त केले.