स्वारातीम विद्यापीठात एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

20 एप्रिल नाव नोंदणीची अंतिम तारीख
नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील नाट्यशास्त्र विभागातर्फे प्रथमच राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धा दि.26 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त कलाकारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
एकपात्री अभिनय स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेत 18 ते 25 वयोगटातील युवक आणि युवती सहभागी होवू शकतात. यात विजेत्या प्रथमक्राच्या कलाकारास 11 हजार रुपये रोख, द्वितीय-7 हजार रुपये, तृतीय-3 हजार आणि उत्तेजनार्थ 5 बक्षीसे प्रत्येकी 1 हजारांची देण्यात येणार आहेत. पहिल्या तीन विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जातील.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना कांही नियम आणि अटी लागू आहेत. त्यात शासन, न्यायव्यवस्था यावर गैरप्रकारचे भाष्य स्वगतामध्ये आढळल्यास स्पर्धक बाद होईल. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. याची स्पर्धकांनी काळजी घ्यावी. स्वगत स्वलिखित चालेल. कोणत्याही नाटकातील स्वगत उताराही चालेल. याबद्दलची माहिती अर्जात भरायची आहे. भुमिकेनुसार वेशभूषा व रंगभूषा असावी भुमिकेला आवश्यक हातातील वस्तु वापरण्यास हरकत नाही. स्वगत सादर करतांना संगीताचा वापर करता येईल आणि ती व्यवस्था स्पर्धकाने स्वत: करायची आहे. स्वगत सादर करण्यासाठी लागणारे साहित्य स्पर्धकाने स्वत: आणायचे आहेत. भाषा, शब्दोच्चार, अंगीक, वाचिक, सात्विक, अभिनयावर मुल्यांकन करण्यात येईल. स्पर्धेसाठी येण्या-जाण्याचा खर्च स्वत: करायचा आहे. प्रत्येक स्पर्धकाला 3 ते 5 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे.
आयोजकांकडून स्पर्धकांसाठी मंच आणि माईकची सोय करण्यात येईल. नाव नोंदणीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल आहे. यास्पर्धेत जास्तीत जास्त कलाकारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ललित व प्रयोगजीवी संकुलाचे संचालक डॉ.पी.विठ्ठल आणि स्पर्धेच्या समन्वयक डॉ.अनुराधा जोशी (पत्की) यांनी केले आहे. स्पर्धकांसाठी पुढील भ्रमणध्वनी क्रमांकावर अधिक माहिती घेता येईल. 7057344411, 7385973056, 8657789377 आणि 8805445966.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *