नांदेड(प्रतिनिधी)-कारेगाव ते उमरी असा दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दोन जणांना लुटण्याचा प्रकार गिरीशभाऊ गोरठेकर इंग्लिश स्कुलच्या समोर 16 एप्रिलच्या रात्री 10.30 वाजता घडला आहे.
साईनाथ विजय चंदनवार हे देशी दारु दुकानाचे मॅनेजर आहेत. त्यांची दुकान कारेगाव येथे आहे. 16 एप्रिलच्या रात्री ते आपली दुकान बंद करून उमरी येथील आपल्या घराकडे येत असतांना त्यांच्यासोबत आणखी एक मित्र होता. रात्री 10.30 वाजता ते गिरीषभाऊ गोरठेकर इंग्लिश शाळेजवळ पोहचले असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन दरोडेखोरांनी त्यांच्या गाडीसमोर आडवी गाडी उभी करून चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडून आणि सोबतच्या मित्राकडून 40 हजार रुपये रोख रक्कम व तीन मोबाईल बळजबरीने लुटले आहेत. उमरी पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 107/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 392,506, 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास उमरीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शेवाळे हे करीत आहेत.
उमरी येथे तीन जणांनी दोघांना चाकुच्या धाकावर लुटले