नांदेड,(प्रतिनिधी)- आपल्याच ९ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून एका जन्मदात्याने नात्यांना काळिमा फासला आहे.नांदेड ग्रामीण पोलिसांनी या नराधम बापाला गजाआड केले आहे.अत्यंत खळबळ जनक घटनेचे समजातून अद्याप आम्ही काहीच शिकलो नाहीत हेच समोर आले.
नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पलीकडे हा प्रकार १५ जूनच्या मध्यरात्री नंतर ३ वाजेच्या सुमारास घडला आहे.रात्री उशिरा अर्थात १६ जूनच्या १ वाजता नांदेड ग्रामीण पोलिसांनी या नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका आईने दिलेल्या तक्रारीनुसार १५ जूनच्या रात्री तिच्या ९ वर्षीय मुलीचा ओरडण्याचा आवाज आल्याने तिने घरात जाऊन पहिले असतांना बालिकेने सांगितले की,तिच्या बापानेच तिच्या सोबत लैगिक अत्याचार केला आहे.आईने आपल्या नवऱ्याला याबाबत विचारणा केली तेव्हा हि बालिका माझी नाही असे सांगत त्याने पत्नीला पण मारहाण केली.१५ चा सूर्योदय होताच आईने आपल्या मुलींना सोबत घेऊन महेर गाठले.तिला एकूण चार मुली आहेत.एकीचे लग्न झालेले आहे. सर्वात लहान बालिका ९ वर्षांची आहे. तिच्यावरचा बापाने लैगिक अत्याचार केला आहे.
अत्यन्त घाबरलेली आई अगोदर वजिराबाद पोलीस ठाण्यात गेली आणि आपल्या बालिकेवरील अत्याचार सांगितला.वजिराबाद पोलिसांनी सर्व माहिती जाणून घेतल्यावर घटना घडली ती जागा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांना नांदेड ग्रामीणचे पोलीस बोलावून तिकडे पाठवले.नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड यांनी याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नराधम बापाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा क्रमांक ३८७/२०२१ दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस उप निरीक्षक गणेश होळकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. पोलिसांनी नराधम बापाला गजाआड केले आहे.
अत्यंत किळस आणणारी घटना घडली आहे.आपल्याच मुलीवर लैगिक अत्याचार करून ती माझी मुलगी नाही असा खुलासा पण देणाऱ्या त्या नराधम बापाने आपले तोंड काळे करून घेतले आहे. ज्या पत्नीने बालीकेच्या रूपात त्याला दिलेले हे निरागस पुष्प त्याने पाया खाली चिरडण्यापेक्षा मरण पावला असता तर जास्त न्याय मिळाला असता असे म्हण्टले तर चूक ठरणार नाही.एकीकडे बायको हवी पण मुली नको असाच हा विचार आहे.आपण बीज रोपण करून वाढवलेले झाड कुऱहाडीने कापण्याचा हा प्रकार नक्कीच निंदनीय आहे.काय अवस्था झाली आहे समाजाची पहा,बापच मुलीवर अत्याचार करत आहेत,अश्या परिस्थितीमध्ये समाजातील इतरांनी केलेल्या लैंगिक अत्याचारांना दाखवतांना शब्द लिहिण्या इतपत दम माझ्याही लेखणीत नाहीत. समाजाने या नराधमाला कोणत्याच प्रकारचा मदतीचा हात देऊ नये.न्यायालयात सुद्धा वकिलांनी त्याचे वकील पत्र घेऊन आपले कसब दाखवू नये असे लिहावे वाटले म्हणून लिहिले आहे.