नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकीवर घराकडे जाणाऱ्या एका महिलेचे 2 लाख 10 हजार रुपयांचे गंठण चोरट्यांनी तोडून पळ काढला आहे.
शोभाबाई राजू केंद्रे रा.कॅनॉल रोड नांदेड या महिला 17 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता आपल्या दुचाकीवर बसून घराकडे जात असतांना चांदोजी पावडे मंगल कार्यालयासमोर त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन व्यक्तींनी त्यांच्या गळ्यात असलेले एक लहान व एक मोठे असे सोन्याचे दोन गंठण तोडले. या सोन्याच्या ऐवजाची किंमत 2 लाख 10 हजार 524 रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचे 2 लाख 11 हजारांचे गंठण बळजबरी तोडले