नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी कशी करावी या मानसिक त्रासाने एका पित्याने मुलीच्या डोक्यात लाकूड घालून, शरिरावर विविध ठिकाणी मारुन मुलीचा खून केल्याचा दुर्देवी प्रकार मौजे जांबखेड ता.मुखेड येथे घडला आहे.
आहिल्याबाई बालाजी देवकत्ते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.19 एप्रिलच्या सकाळी 10 ते 11 वाजेच्यासुमारास त्यांची मुलगी सिंधुताई उर्फ छकुली हिस तिचा वडील बालाजी विश्र्वंभर देवकत्ते हा तुझ्या लग्नाची तयारी कशी करू, लग्नासाठी शेती विकावी लागत असेल तर मुलीला मारुन टाकलेले बरे असे बोलत बोलत त्यांने बाजेचा गात (लाकडी दांडा) हाता घेवून सिंधूताईच्या डोक्यात, उजव्या हाताच्या मनगटावर मारले आणि तिचा जिव घेतला. या तक्रारीवरुन मुखेड पोलीसांनी गुन्हा क्रमांक 124/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 324, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक एन.डी.फड यांच्याकडे देण्यात आला आहे. आपल्या मुलीचा खून करून वडील पळून गेला आहे.पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
लग्नाच्या चिंतेत वडीलाने मुलीचा खून केला