व्हिडीओ व्हायरल करून आत्महत्या केल्याप्रकरणी भाऊ आणि भावजईवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-भाऊ शेतीचा वाटा करून देत नाही या कारणासाठी एका भावाने आपला व्हिडीओ व्हायरल करून आत्महत्या केल्याचा प्रकार मौजे हिब्बट ता.मुखेड येथे घडला आहे.
शामला रमाकांत कागणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 9.30 वाजेदरम्यान त्यांचा नवरा रमाकांत हनुमंत कागणे (36) रा.हिब्बट ता.मुखेड यांनी आपल्या स्वत:च्या शेतात उभे राहुन आपण आत्महत्या करत आहे असा व्हिडीओ बनवला. त्यानंतर गळफास घेवून आत्महत्या केली. व्हिडीओमध्ये रमाकांत कागणे सांगतात माझा भाऊ आणि माझी भावजई मिळून माझ्या वडीलोपार्जित संपत्तीचा हिस्सा मला देत नाहीत म्हणून मी आत्महत्या करीत आहे. मी मेल्यानंतर माझ्यावर आरोप होतील की, मी नशेबाज आहे, कर्जबाजारी झालो आहे. याबद्दल सुध्दा रमाकांत कागणे आपल्या व्हिडीओमध्ये सांगतात. माझ्या हिस्याची संपत्ती मिळाल्यानंतर माझी पत्नी ते कर्ज फेडेल. मी नशेबाज नाही आहे आणि माझा भाऊ आणि भावजई यांनी माझ्या संपत्तीचा हिस्सा न दिल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.
मुखेड पोलीसांनी या प्रकरणी शामला कागणे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 125/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 306 आणि 34 जोडण्यात आली आहेत. पोलीस निरिक्षक व्ही.व्ही.गोबाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जाधव यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. रमाकांत कागणेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा त्याचा भाऊ गोविंद कागणे आणि भावजई अनुसया कागणे यांचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *