जिल्ह्यात 9 घरे फोडले, दोन दुचाकी चोरी; 6 लाख 16 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-धामनगाव ता.मुखेड येथे चोरट्यांनी चार घरफोडून एकूण 3 लाख 91 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. मौजे भोपाळा ता.नायगाव या गावातील दोन घरफोडून चोरट्यांनी 25 हजार 400 रुपयांचा ऐवज लांबवला आहे. मौजे वझर ता.देगलूर येथे 35 हजार रुपये चोरीला गेले आहेत. निळा ता.नांदेड या गावातून 25 हजार रुपये चोरीला गेले आहेत. किनवट आणि नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 लाख 40 हजार रुपयांच्या दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या सर्व चोऱ्यांमध्ये मिळून 6 लाख 16 हजार 400 रुपयंाचा ऐवज लंपास झाला आहे.

मुखेड तालुक्यातील धामनगाव येथे 26 एप्रिलच्या रात्री 11 ते 27 एप्रिलच्या पहाटे 5 वाजेदरम्यान चोरट्यांनी 4 वेगवेगळे घर फोडले. या घरांमधून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 3 लाख 91 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. माधव गोविंद खोकले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुखेड पोलीसांनी चार घर फोडल्याचा चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक जाधव हे अधिक तपास करीत आहेत.

मौजे भोपाळा ता.नायगाव येथील मनोहर मारोती बावणे आणि त्यांच्या शेजारी राहणारे दुसरे व्यक्ती गावात सुरू असलेल्या धार्मिक सप्ताह कार्यक्रमात केले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी 27 एप्रिल रोजी दोन घरे फोडून त्यातील 25 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरला आहे. रामतिर्थ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार इंगळे हे अधिक तपास करीत आहेत.

मौजे वझर ता.देगलूर येथील खदीर हुसेन साब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 एप्रिलच्या रात्री 11 ते 27 एप्रिलच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांचे आणि इतर शेजारी व्यक्तीचे घर फोडून चोरट्यांनी 35 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. मरखेल पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

मौजे निळा ता.नायगाव येथे 27 एप्रिलच्या रात्री 1 ते 1.30 वाजेदरम्यान सौ.सविता माधव कदम यांच्या पाठीमागील दरवाजा हात घालून काढला आणि लोखंडी पेटीत ठेवलेेले 25 हजार रुपये चोरून नेले आहेत. लिंबगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अशोक दामोधर अधिक तपास करीत आहेत.

बऱ्यामसिंघ नगर भागातून 21 एप्रिल रोजी रात्री 2 ते पहाटे 8 वाजेदरम्यान गौरव दिपक शिवणकर यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.जे.3554 ही 80 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार देशमुख अधिक तपास करीत आहेत. किनवट येथील इकबाल धाबासमोरून शैलंेंद्र नरसींगराव बेलसरकर, यांची दुचाकी गाडी क्रमांक टी.एस.01 ई.एफ.9159 ही 60 हजार रुपये किंमतीची गाडी 24 एप्रिलच्या रात्री 9.50 ते 10.20 या वेळेत चोरीला गेली. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार मामीडवार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *