नांदेड(प्रतिनिधी) -भोकर शहरातील विश्र्वकर्मानगर येथे चोरट्यांनी एक घरफोडून 7 लाख 6 हजार 160 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मौजे पिंपरी (मक्ता) ता.नांदेड येथे एका घरातून चोरट्यांनी 62 हजारांचा ऐवज लांबवला आहे. मुदखेड ते माळकौठा रस्त्यावर 25 हजारांची चोरी झाली आहे.
विश्र्वकर्मानगर भोकर येथे राहणारे साईनाथ भिमराव दासरवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 एप्रिलच्या दुपारी 12 ते 28 एप्रिलच्या पहाटे 7 वाजेदरम्यान ते आणि त्यांचे कुटूंबिय नागपूर येथे गेले होते. या संधीचे सोने करत चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 7 लाख 6 हजार 160 रुपयांचा ऐवज चोरून नेला. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक कांबळे करीत आहेत.
मौजे पिंपरी (मक्ता) येथे 28 एप्रिलच्या पहाटे 2 वाजेच्यासुमारास कोणी तरी चोरट्यांनी छोट्या-छोट्या खिडक्यांचा आधार घेवून त्यांच्या घरावर आले आणि भारत सखाराम पोहरे आणि त्यांचे नातेवाईक राधाबाई लोकडे यांच्या कानातील झुंबर जोराने ओढून दुखापत करून ते चोरून नेले. सोबतच कपाटातील कांही रक्कम आणि इतर साहित्य असा 62 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. लिंबगाव पोलीसंानी याबाबत गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अशोक दामोधर करीत आहेत.
प्रकाश दत्तराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 एप्रिलच्या सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास शंकरनगरच्या उतारावर रोहिपिंपळगाव, मुदखेड ते माळकौठा रस्त्यावर अशोक लोभाजी शिंदे यांच्या शेताजवळ ते आणि त्यांचे मित्र दुचाकी क्रमांक एम.एच.26 वाय.3402 वर बसून मुखेड ते वसंतवाडीकडे जात असतांना नैसर्गिक विधीसाठी थांबले. तेवढ्यात त्यांच्या मागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांची दुचाकी आणि एक मोबाईल असा 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.
तिन वेगवेगळ्या चोऱ्यांमध्ये 7 लाख 93 हजारांचा ऐवज लंपास