नांदेड(प्रतिनिधी)-शेतात जागलीसाठी झोपलेल्या शेतकऱ्याला उचलून नेऊन त्याला मारहाण करून 20 लाखांची खंडणी मागून दरोडा टाकणाऱ्या एकाला पकडल्यानंतर हदगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुविधा पांडे यांनी त्यास 2 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
पुंडलिक हरिश्चंद्र कपाळे रा.चाभरा हे आपल्या शेतात झोपले असतांना त्यांना दोन व्यक्तीने उचलून दुसरीकडे नेले आणि हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावली आणि मारहाण केली. आम्हाला 20 लाख रुपये खंडणी दे असे ते हिंदीतून बोलत होते. तेंव्हा मी शेतकरी आहे कांही उधारी वगैरे घेवून तुम्हाला 3 लाख रुपये देतो असे सांगितले. पण त्या दरोडेखोरांनी एक मोबाईल, एक एटीएम कार्ड, व 2600 रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे. या बाबत मनाठा पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा क्रमांक 82/2022 नुसार मनाठा पोलीसंानी केशव विश्र्वनाथ मगर (38) यास अटक केली. पोलीस उपनिरिक्षक टी.वाय.चिट्टेवार यांनी आज त्यास न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड.गिरीश मोरे यांनी पोलीस कोठडी देण्याची विनंती केल्यानंतर न्यायाधीश सुविधा पांडे यांनी 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या दत्ता मोतीराम पवार यास 2 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
20 लाखांची खंडणी मागणाऱ्या एकाला पोलीस कोठडी