नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा जात पडताळणी विभागात पोलीस उपअधिक्षक असलेल्या नरसींग गणपतराव अकुसकर यांची आज पोलीस सेवा पुर्ण झाली. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी त्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी शुभकामना दिल्या.
आडस ता.केज जि.बीड येथील नरसींग गणपतराव अकुसकर हे परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठातून एमएससी .ऍग्री पदवी घेवून 1989 मध्ये पोलीस पोलीस उपनिरिक्षक झाले. सुरूवातीला उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, या जिल्ह्यात प्रवास करत त्यांनी सन 2001 मध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक ही पदोन्नती प्राप्त केली. त्यानंतर लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात काम केले. सन 2009 मध्ये पोलीस निरिक्षक पदोन्नती घेवून त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड आणि लातूर येथे काम केले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक पदावर सोलापूर शहरात काम केले आणि नांदेडला आल्यावर त्यांची नियुक्ती पोलीस निरिक्षक मुखेड या पदावर झाली. त्यानंतर त्यांची पदोन्नती पोलीस उपअधिक्षक पदावर झाली आणि त्यांना जात पडताळणी विभाग नांदेड येथे नियुक्ती देण्यात आली. आपल्या जीवनात 33 वर्षांची सेवा पुर्ण करून नरसींग अकुसकर यांनी आज सेवानिवृत्तीच्या दिवशी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्याकडून शुभकामना घेवून आपल्या जबाबदारीला निरोप दिला.