नांदेड,(प्रतिनिधी)- रसिकांच्या उपस्थित ३ मे रोजी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले व विश्वगुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव साजरा करण्यात आला तसेच या कार्यक्रमा निमित्त दिनांक 3 मे रोजी हॉटेल अतिथी येते दैनिक अर्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विधी रत्न पुरस्कार 2022, दैनिक अर्थ माता रमाई आंतरराष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार 2022 या पुरस्कार देण्यात आला .
दैनिक अर्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विधी रत्न पुरस्कार वर्ष२०२२ पुरस्कार ,ॲड. नितीन लक्ष्मणराव कागणे , ॲड.माणिक बापूराव वाखरडे , अॅड.शैलेशचंद्र रुपचंद कोंडेकर, ॲड. विशाखा समाधान बोरकर , ॲड.सचिन संभाजी मगर चाभरॆकर, ॲड.जी.एस.पांचाळ मुगटकर, आणि” दैनिक अर्थ माता रमाई आंतरराष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार 2022 ” वर्ष २०२२ पुरस्कार ॲड. माया छगन राजभोजर्ती, श्रीमती. कांचन पांडुरंग चव्हाण, ॲड. पंचशीला झगडे, यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आला असल्याची माहिती संयोजक दैनिक अर्थ चे मुख्य संपादक ॲड. अनुप आगाशे ॲड.शितल अनुप आगाशे यांनी दिली आहे.
वकिली क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दैनिक अर्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विधी रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. या पुरस्काराचे स्वरूप घटनेची प्रत , मानचिन्ह , सन्मानपत्र आणि पेन असे आहे .
महिलांची उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी
दैनिक अर्थ माता रमाई आंतरराष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे. या पुरस्काराचे स्वरूप घटनेची प्रत , मानचिन्ह , सन्मानपत्र आणि पेन असे आहे .
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले व विश्वगुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त दिनांक 3 मे रोजी हॉटेल अतिथी येते दैनिक अर्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विधी रत्न पुरस्कार 2022, दैनिक अर्थ माता रमाई आंतरराष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार 2022 या पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले असून भव्य व्याख्यानमाला व गीत आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . ॲड. आशिष गोधमगांवकर
जिल्हा सरकारी वकील व शासकीय अभियोक्ता नांदेड, उदघाटक विनोद रापतवार जिल्हा माहिती अधिकारी,नांदेड , प्रमुख पाहुणे ॲड.ॲड.नितीन कागणे , वैजनाथ तोणसुरे राज्य उपाध्यक्ष शिवा संघटना, ॲड.जगजीवन भेदे मा .दशरथ रोडे यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाचे प्रस्तावना अँड.यशोनील मोगल व जया ढवळे यांनी केले व समारोप. ॲड.हुके यांनी केले . मुख्य संपादक अँड. अनुप आगाशे, अँड. शितल अनुप आगाशे(क्षीरसागर), अब्दुल सोहील, गणेश कँचकलवार ,शेख वशिम , रामकिशन गंगाधर पालनवार, शैलेंद्र शर्मा, गौतम सूर्यवंशी ,गजानन गिरगावकर, राजू गायकवाड, सचिन शिंदे, राजू आगाशे, उत्तम लांडगे, विजय गायकवाड, संतोष वाघमार, तुकाराम जवादवार.