नांदेड,(प्रतिनिधी)- राजपूत स्टॊक फोर्सने आज अनेक प्रशासनिक अधिकाऱ्यांना भेटून वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी जन्मोत्सव विहित दिवशीच सर्वत्र साजरा करण्याच्या सूचना द्याव्यात असे निवेदन दिले आहे.
आज राजूपत स्टॊक फोर्सने जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय आणि मंत्रालय मुंबई यांना दिलेल्या निवेदनानुसार वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी जन्मोत्सव राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार विहित दिवशीच साजरी व्हावी. मंत्रालयाने चुकीची प्रसिद्ध केलेली तारीख बदलावी आणि जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय आणि सर्व सरकारी संस्था येथे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी जन्मोत्सव उत्साहात साजरा करावा.असे या निवेदनात लिहिलेले आहे.
