परभणी येथे सन 2010 ते 2013 या कालखंडात कार्यरत असलेले अनेक कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता आणि कंत्राटदार यांच्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल 

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2010 ते 2013 या चार वर्षाच्या कालखंडात परभणी येथे कार्यरत असलेले सर्व कार्यकारी अभियंता, सर्व उपअभियंता आणि सर्व शाखा अभियंता यांनी कंत्राटदार एस.जी.पाटील सोबत संगणमत करून, खोटे अभिलेख तयार करून शासनाचे 26 लाख 44 हजार रुपये बिल उचलून मोजमाप पुस्तिका चोरून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आ.प्रशांत बंब यांच्या तक्रारीवरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
                               लासूर ता.गंगापूर जि.औरंगाबाद येथील आ.आ.प्रशांत बंब यांनी 5 मे 2022 रोजी दिलेल्या जबाबाप्रमाणे त्यांनी 1 जानेवारी 2010 ते 31 डिसेंबर 2010 दरम्यान परभणी जिल्ह्यातील दैठणा, माळसोना, वझुर, देवळगाव दुधाटे येथील 43 क्रमांकाच्या रस्ता सुधारणा कामी पाहणी केली हेाती. या कामासाठी केंद्रीय निधीअंतर्गत 1 कोटी 19 लाख 119 रुपये मंजुर करण्यात आले होते. मे.पल्लवी कंस्ट्रक्शनचे कंत्राटदार एस.जी. पाटील रा.परभणी यांना हे काम देण्यात आले होते. या कामात कंत्राटदाराने निविदेतील अटीप्रमाणे अधिकृत शासकीय रिफायनरीतून ते डांबर खरेदी करणे आवश्यक होते. परंतू कंत्राटदारानी हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोेरेशन लिमिटेड या नावाचे बनावट पाच चलन तयार करून ते त्या चलनानुसार खरेदी केल्याचे भासवले आणि शासनाची 26 लाख 44 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. सन 2012-2013 मध्ये महालेखाकार-2 नागपूर यांच्या लेखा परिक्षणात डांबराची खोटी बिले सादर केल्याचे निर्देशनास आले. सोबतच या कामात तत्कालीन शाखा अभियंता, तत्कालीन उपअभियंता परभणी आणि कार्यकारी अभियंता परभणी हे सामिल असल्याचे लिहिले होते. डांबर घेतलेल्या कंपनीकडून पडताळणी करणे क्रमप्राप्त असतांना सुध्दा तसे करण्यात आले नाही आणि मोजमाप पुस्तिका क्रमांक 4517 प्रमाणे शासनाचे 26 लाख 44 हजार रुपये या पल्लवी कंस्ट्रक्शनचे कंत्राटदार एस.जी. पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी जाणिवपुर्वक 26 लाख 44 हजारांची चोरी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक होते. परंतू सार्वजनिक बांधकाम विभाग काहीच कार्यवाही करत नाही म्हणून मी ही तक्रार दिली आहे असे या एफआयआर मध्ये लिहिले आहे. या तक्रारीमध्ये मोजमाप पुस्तिका क्रमांक 4517 ही संगणमताने, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरली आहे. म्हणून मी पल्लवी कंस्ट्रक्शनचे कंत्राटदार एस.जी. पाटील रा.परभणी तसेच सन 2010 ते 2013 या चार वर्षात कार्यरत असलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व कार्यकारी अभियंते, सर्व उपअभियंते आणि सर्व शाखा अभियंते या गुन्हयास  जबाबदार आहेत.
                      परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात या तक्रारीनुसार 5 मे 2022 रोजी सायंकाळी 7.55 वाजता गुन्हा क्रमांक 153/2022 दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा घडल्याचा वेळ एफआयआरप्रमाणे 1 जानेवारी 2010 च्या मध्यरात्रीपासून 31 डिसेंबर 2013 च्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत घडलेला आहे असे एफआयआरमध्ये नमुद आहे. म्हणजेच हा गुन्हा जवळपास 9 वर्षांनी दाखल झाला आहे.म्हणजेच गुन्हा उशिरा दाखल करताच येतो.या गुन्ह्याचा तपास नानलपेठचे पोलीस निरिक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या कडे देण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेचे कलमे 420, 418, 466, 467, 468, 471 आणि 34 जोडण्यात आली आहे. एफआयआरमधील शब्दांप्रमाणे पुरावा नष्ट करणे यासाठी लागणारे भारतीय दंड संहितेतील कलम 201 आणि मोजमाप पुस्तिकेची चोरी गेली या शब्दांसाठी आवश्यक असलेले कलम 379 या एफआयआरमध्ये नमुद नाही.
                       राज्याचा पैसा अर्थात सर्वसामान्य माणसाची संपत्ती ही विविध भ्रष्टाचारी मार्गाने सार्वजनिक बांधकाम विभागात महाराष्ट्रभर चोरी केली जाते या मुद्यासाठी आ.प्रशांत बंब यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. त्यांच्या पोटतिडकीने मांडल्या जाणाऱ्या या भ्रष्टाचार बाबतच्या तक्रारींना कोणीच थारा दिला नाही. पण आता नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने अनेक कार्यकारी अभियंते, अनेक उपअभियंते आणि अनेक शाखा अभियंते यांची दुकान उघडली गेली आहे. आता तरी यापुढे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला कांही तरी कळेल आणि नागरीकांच्या मालकीची संपत्ती अर्थात रक्कम, आता तरी योग्य दृष्टीकोणातून वापरली जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *