दिग्गज पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांची मराठी पत्रकार परिषद इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया सेलच्या राज्य समन्वयकपदी निवड

नांदेड, (प्रतिनिधी)-पत्रकारांची मातृ संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य आघाडी च्या समन्वयक पदी हिंगोली चे पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित गंगाखेड तालुका पत्रकार संघ आयोजित आदर्श जिल्हा तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा मध्ये मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शन व आदेशाने कन्हैया खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली. कन्हैया खंडेलवाल यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया सेल बळकट करून मराठी पत्रकार परिषद ची ताकद वाढविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कन्हैया खंडेलवाल यांच्या झालेल्या नियुक्तीचे मराठी पत्रकार परिषद चे प्रमुख विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक कार्याध्यक्ष शरद पाबळे सरचिटणीस संजीव जोशी कोषाध्यक्ष विजय जोशी प्रसिद्धीप्रमुख अनिल महाजन यांनी कौतुक केले आहे.

नियुक्ती वेळी कन्हैया खंडेलवाल यांच्यासोबत मराठी पत्रकार परिषद हिंगोली चे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष विजय दगडू हिंगोली तालुका अध्यक्ष प्रकाश इंगोले कळमनुरी तालुका अध्यक्ष अलीम कादरी सौरभ साकळे नारायण काळे संजय शितळे उपस्थित राहून अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *