.. आता नांदेड क्लबमध्ये दारु, सिगरेट, तंबाखु विक्री आणि सेवन होणार नाही?

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या नांदेड क्लबमध्ये दारु, सिगरेट आणि तंबाखू विक्री करणे आणि सेवन करणे याबदलासह दाखल करण्यात आलेला चेंज रिपोर्ट सहाय्यक धार्मिक आयुक्त-1 एस.आर.कुलकर्णी यांनी फेटाळला आहे. आणि कलबच्या अध्यक्षाला अर्थात जिल्हाधिकाऱ्यांना सुचना दिली आहे की, मॅनेजिंग कमेटी निवडण्यासाठी निवडणुक घ्यावी.
नांदेड क्लब ही अशी विश्र्वस्त संस्था आहे. ज्यामध्ये बऱ्याच सुविधा आहेत. त्या बऱ्याच दिवसांपासून सुरूपण आहेत. पण या सुविधांसह अनेक बाबी क्लब चालतच होत्या. या संदर्भाने चौकशी क्रमांक 637/2020 आणि चौकशी क्रमांक 586/2021 अशा दोन चौकश्यांचा निर्णय सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी 5 मे रोजी दिला आहे. संस्थेमध्ये फेरफार करण्यासाठी आणि नवीन नियम आणि नियमावली तयार करण्यासाठी या चौकश्या दाखल करण्यात आल्या होत्या. या नांदेड क्लबमध्ये अध्यक्ष हे जिल्हाधिकारी नांदेड हे आहेत. उपाध्यक्ष पोलीस अधिक्षक हे आहेत यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, मनपा आयुक्त यांच्यासह 15 सदस्य सर्वसाधारण सभेत निवडले पाहिजेत. ते 3 वर्षासाठी. त्यातील 8 सदस्य हे आजिवन सदस्य असावेत. 7 सदस्य सर्वसाधारण सदस्य असतील आणि दोन नियुक्त केलेले सदस्य असतील अशा या समितीची संरचना नांदेड क्लबच्या संविधानात लिहिलेली आहे. यासाठीची निवडणूक प्रक्रिया अध्यक्ष अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी करायची असते. त्यांच्या अनुउपस्थितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि मनपा आयुक्त यांच्यावर ही जबाबदारी आहे.
या क्लबमध्ये सिगारेट, दारु, तंबाखू, विक्री करणे आणि त्यांचे सेवन करणे याबदलांसह हा नविन चेंज रिपोर्ट धर्मदाय आयुक्तांकडे दाखल करण्यात आला होता. त्याबद्दल आपल्या निर्णयात धर्मदाय आयुक्तांनी अध्यक्ष अर्थात जिल्हाधिकारी यांनी मॅनेजिंग कमेटीला दिलेले अधिकार बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. संविधानात नवीन नियमावली जोडणे ही संविधानाच्या मुळ संविधानात नसल्याने ती मागणी बेकायदेशीर आहे. धर्मदाय आयुक्तांनी.चौकशी क्रमंाक 637/2020 आणि 586/2021 प्रमाणे नांदेड क्लबच्या संविधानातील बदल मागण्याची पध्दत नांदेड क्लबच्या मुळ संविधानात नसल्याने या चौकश्या फेटाळल्या आहेत. त्या चौकशांमधील महत्वपूर्ण मागणी नांदेड क्लब परिसरात दारु, सिगरेट, तंबाखू यांची विक्री आणि सेवन करण्याची मागणी आहे. सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 च्या कलम 22 प्रमाणे मागण्यात आलेला हा फेर बदल नाकरलेला आहे. त्यामुळे या पुढे तरी नांदेड क्लबमध्ये दारु, सिगरेट, तंबाखू विक्री आणि सेवन करण्यास पुर्णपणे बंदी राहील अशी अपेक्षत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *