
नांदेड,(प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)नांदेड जिल्ह्याच्या वतीने मा.ना.डाॅ.रामदासजी आठवले राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मा.विजयदादा सोनवणे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मशिदीवरील व मंदिरावरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेला कृतीशील विरोध,नांदेड जिल्ह्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास सीबीआय मार्फत करा,औरंगाबाद येथील मनोज शेषेराव आवाड यांची काही माथे फिरूनी निघृणपणे हत्या केली या हत्येतील आरोपींना त्वरीत अटक करून फाशीची शिक्षा द्या, नांदेड जिल्ह्यातील अवैद्य धंदे बंद करा,राज्य सरकारने मागासवर्गीयाचे नौकरी मधील अनुशेष भरून काढावा,सन 2019 पर्यंतच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता द्या,रमाई आवास योजना,प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थीयांना मोफत रेती पुरवठा करा या सह आदि मागण्यासाठी निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देताना रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे,मिलिंद शिराढोणकर नांदेड जिल्हाध्यक्ष (उ.)गौतम काळे नांदेड जिल्हाअध्यक्ष (द.)नांदेड महानगर अध्यक्ष धम्मपाल धुताडे,नांदेड जिल्हा सरचिटणीस संजय भालेराव ,अशोकराज काबळे,युवा नेते राहुल लांडगे,माणीक गायकवाड,लखन सिंग जुन्नी,आनंद गजभारे,विशाल गायकवाड,अतिष हनमंते,नागसेन लोकरे,रामा चिंतोरे,श्रीपाल लोकरे,प्रंशात मेटकर,अजिंक्य गायकवाड,अशिष ताटे,सचिन सितळे,बिबीस्वरी सुर्यवंशी,सोनु वाघमारे,मोनु थडके,खाजा भाई,प्रंशात कांबळे आदि कार्यकर्ते उपस्थितीत होते.