नांदेड(प्रतिनिधी)-उन्हाणे थैमान घातल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात आज वादळी वार्यांनी आक्रमण केले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार वादळी वार्याने शेतकर्यांना सुध्दा फटका दिला आहे.
मार्च महिन्यापासूनच अत्यंत कडक उन्हाचे चटके नागरीकांना देशभर मिळत होते. असाच कांहीसा प्रकार नांदेड जिल्ह्यात पण सुरू होता. मागील दोन-तीन दिवसांपासून उकाडा जास्त वाढला आणि त्याचा पहिला झटका नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये आज दिसला. नायगाव तालुक्यातील एका गावात अत्यंत सुसाट वादीवारे वाहत होते. या गडबडीत दोन मित्र आपली दुचाकी गाडी सुरू करून जाण्याच्या तयारीत असतांना त्यांच्या पाठीमागून एका घरावरचा पत्रा उडाला. तो पत्रा त्यांच्या दिशेनेच येत होता. गाडीचा पाठी मागे उभ्या राहिलेल्या व्यक्तीने ते उडून येणारा पत्रा पाहिला आणि जीवाच्या आकांताने गाडीवर बसलेल्या आपल्या मित्राचे डोके खाली करून पळ काढला. सुदैवाने काही क्षणांच्या दक्षतेत त्या दोघांवर आलेला काळ बाजूला झाला. वादळी वार्याने शेतकर्यांना सुध्दा फटकाच दिला आहे. आंब्याचा मोहर आणि काही ठिकाणी आंबे पडल्याचे लोक सांगत आहेत. जनतेने सुध्दा वादळी वार्याच्या संदर्भाने दक्षता घेवूनच आपल्या घराबाहेर पडावे अशी आजची परिस्थिती आहे.