नांदेड(प्रतिनिधी)-भोकर गावात एक घरफोडून 3 लाख 15 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. मुंजाजीनगर येथून 15 हजार रुपये किंमतीचे संगणक चोरी गेले आहे. मरखेल येथे 2 हजार रुपयांची सिमेंट खांब चोरीला गेले आहेत.
अब्दुल खादर अब्दुल हमीद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 मे च्या दुपारी 2 ते 17 मेच्या दुपारी 2 या दरम्यान त्यांचे घर बंद असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 3 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक अनिल कांबळे अधिक तपास करीत आहेत.
ऍड. शहजाद जुल्फेखारोद्दीन सिद्दीकी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 मे रोजी रात्री 11 ते 18 मेच्या पहाटे 5 वाजेदरम्यान मुंजाजीनगर भागातून त्यांच्या भावाच्या घरातून 15 हजार रुपये किंमतीचा संगणक चोरीला गेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार बंडेवार हे करीत आहेत.
संग्राम गंगाधर पांढरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे हाळी ता.देगलूर येथे सतिश शंकरराव जाधव यांच्या शेत गट क्रमांक 235 मधील एमएससीबीचे तार नसलेले सिमेंटचे दोन पोल किंमत 2 हजार रुपये चोरीला गेले आहेत. मरखेल पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार प्रभाकर कदम अधिक तपास करीत आहेत.