नांदेड(प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा नांदेड जिल्हा कार्यकर्ता मेळावा दि.21 मे 2022 रोजी सायं.4 वा.पँथर नारायण गायकवाड नगरी डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ना.डॉ.रामदास आठवले, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री राहणार असून उद्घाटक खा.प्रतापराव पाटील चिखलीकर हे राहणार आहेत. मेळाव्याचे अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे, प्रमुख उपस्थिती आ.राजेश पवार,आ.तुषार राठोड, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले,भाजपा महानगर अध्यक्ष हे राहणार आहेत.
तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिध्द गायिका वैशालीताई शिंदे आणि त्यांचा संच मुंबई यांचा भिमगीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम दि.21 मे रोजी दु.4 वा.होणार आहे.या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाच्या नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष गौतम काळे, मिलिंद शिराढोणकर, महानगर अध्यक्ष धम्मपाल धुताडे यांनी केले आहे.
रिपब्लिकन पक्षाचा ना.डॉ.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शहरात जिल्हा कार्यकर्ता मेळावा