नांदेड (जिमाका) – महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड या कार्यालयातील अंगणवाडी मदतनिसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका अंतर्गत स्थानिक रहिवाशी असलेल्या महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज 10 जुलै 2023 पर्यंत मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने उमेदवारांची अंतिम व प्रतिक्षा यादी http//nanded.gov.in या संकेतस्थळावर व तसेच संबंधित नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या नोटीस बोर्डावर 18 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आवाहन व्हि. एस. बोराटे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड यांनी केले आहे.
Related Posts
वंचित बहुजन आघाडीची नांदेड उत्तर जिल्हा कार्यकारणी जाहीर
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून नांदेड उत्तर जिल्हा कार्यकारणी जाहीर करणारे प्रसिध्द पत्रक वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर…
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 लाख 50 हजारांची लुट
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जबरी चोरी झाली असून दोन दुचाकीवर आलेल्या चार जणांनी त्यांना मारहाण करून 1 लाख…
दिव्यांग शाळांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दिव्यांग विशेषतः मतिमंद शाळेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ४ महिन्यांपासून थकले असल्याची धक्कादायक बाब समोर आली…