अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-वसमत मालेगाव रस्त्यावर उमरी फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार जखमी झाले. एका स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
निलेश इंगोले (22) आणि राजेश शेषराव वाकडे (21) हे दोघे 6 जुलैच्या रात्री वसमत येथून अर्धापूरकडे दुचाकीवर येत असतांना मालेगाव चौकी ते उमरी फाटा या रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यात दोन्ही स्वार जखमी झाले. महामार्ग पोलीसांनी या दोघांना दवाखान्यात नेणे पण निलेश इंगोलेचा मृत्यू उपचारादरम्यान झाला अशी माहिती सांगण्यात आली. राजेश वाकडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. अर्धापूर पोलीसांनी याप्रकरणी अज्ञात वाहनांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *