अमृततूल्य चहाची शाखा मिळवून देतो म्हणून 4 लाख 20 हजारांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-अमृततूल्य चहाची शाखा मिळविण्यासाठी 4 लाख 20 हजार रुपये घेवून फसवणूक करणाऱ्या दोघांविरुध्द सोनखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सौ.लावण्या नागेश बेटमोगरेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार साईकुमार(24) रा.तय्यब मंजिल, रामनगर भायखळा मुंबई आणि म्याना राजन्ना रा.जुने बस स्टॅंड जगत्याल तेलंगणा या दोघांनी अमृततूल्य चहाची शाखा किवळा येथे मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून शाखेची किंमत 4 लाख आणि स्वत:चे कमीशन 20 हजार असे 4 लाख 20 हजार रुपये घेतले. परंतू अमृततूल्य चहाची शाखा मिळाली नाही. तेंव्हा पाठपुरावा करण्यात आला. उद्‌घाटनाचे साहित्य देवून या दोघांनी 4 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार दिली. हा प्रकार 2 नोव्हेंबर 2022 रोजी दाखल झाला. पण घडलेला प्रकार 17 सप्टेंबर 2021 ते 18 डिसेंबर 2021 या दरम्यानचा आहे. या तक्रारीला उशीर झाल्याबद्दलचे स्पष्टीकरण लिहितांना अमृततूल्य चहाच्या मालकाशी संपर्क साधून त्यांना पत्र देवून विचारणा केली असता त्यांनी या दोन्ही आरोपींना अमृततूल्य चहाची शाखा देण्याचा काही अधिकार नाही असे पत्र दिल्यानंतर तक्रार देण्यात आली आहे. सोनखेड पोलीसांनी दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 406,420 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 156/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक चंदनसिंह परिहार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *