नांदेड,(प्रतिनिधी)- आज कोरोनाने फक्त एक नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिला आहे. दोन जणांची कोरोनाबाधेतुन मुक्ती झाली आहे.आज दोन गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहिती नुसार आज दि.28 फेबु्रवारी रोजी कोरोना बाधेने एका रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज 01 नवीन कोरोना रुग्ण सापडला आहे.नांदेड मनपा विलगिकरणातून-02 दोन रुग्णांची सुट्टी झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 100042 झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण 97.35 टक्के आहे.आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपात एकच रुग्ण सापडला आहे. आज 711 अहवालांमध्ये 705 निगेटिव्ह आणि 01 पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 102757 झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत 00 आणि 01 अँटीजेन तपासणीत असे एकूण 01 रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी 00 अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब 05 आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब 00 आहेत.आज कोरोनाचे 25 ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण-12, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-06,सरकारी रुग्णालय -05, खाजगी रुग्णालयात- 02, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात 02 रुग्ण आहेत.
Related Posts
न्यायालय परिसरासमोर होणाऱ्या वाहतुक कोंडीला पर्याय आहे का हो…
नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकी वाहनांमुळे न्यायालय परिसरात होणारी गर्दी पाहुन अनेक दुचाकी गाड्यांना न्यायालय ते रेल्वे स्थानक जाणाऱ्या रस्त्यावर न्यायालय परिसरा बाहेर उभे…
“सही पोषण देश रोशन’ या घोषवाक्याने दुमदुमली शाळा
नांदेड(प्रतिनिधी)-“सही पोषण देश रोशन’ या घोषवाक्यासह जागतिक कन्यादिनी नोबल उर्दु हायस्कुल येथे बालिकांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम बाल विकास…
नांदेडच्या प्रवेशद्वारावरीलस समतेचा विचार जागराचे हे प्रेरणास्थान- पालकमंत्री अशोक चव्हाण
• जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे जगदगुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामींच्या हस्ते अनावरण • लोकार्पण सोहळ्याला दिवाळी सणाचा उत्साह …