नांदेड,(प्रतिनिधी)-दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी समर्थ रामदासांचे जन्मगाव असलेल्या जांब(समर्थ) ता. घनसांगवी जि. जालना येथे श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन केले आहे. गंगा दशहरा या पावन पर्वानिमित्त दिनांक 4 जून 22 ते 12 जून 22 या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या या उत्सवात नामवंत किर्तनकार,प्रवचनकार व गायक यांचा सहभाग राहणार आहे. तसेच ग्रंथराज श्रीमत् दासबोध या ग्रंथाचे पारायण होणार आहे.तसेच दासबोध अभ्यास वर्ग व श्री समर्थ संप्रदाय उपासना इ कार्यक्रमाचा समावेश असेल.2003 पासून सतत संपन्न होणाऱ्या या उत्सवात अनेक समर्थ वाढता सहभाग लक्षणीय आहे. मागील 20 वर्षांपासून यशस्वीपणे आयोजन होत असल्याबद्दल आयोजक गिरीश वसंतराव सातोनकर,संभाजीनगर (औरंगाबाद) यांनी आनंद व्यक्त केला. दोन वर्षापासून कोविड च्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष स्वरूपात सहभाग न नोंदविता न आल्यामुळे यावर्षी उपस्थिती लक्षणीय राहण्याची शक्यता आहे. तरी भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक,तबलावादक, तालदास गिरीश सातोनकर यांनी सर्वांना केले आहे.
Related Posts
एलसीबीच्या दबंग पोलीस उपनिरिक्षकाने दोन तलवारी पकडल्या
मुखेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील अत्यंत दमदार पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या अत्यंत कुशल नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेतील दबंग पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव…
गणेशनगर पोलीस चौकीच्या आसपास विक्री होणाऱ्या अवैध दारुमुळे ‘खलक’ त्रासला
नांदेड(प्रतिनिधी)-गणेशनगर पोलीस चौकीच्या आसपास असणाऱ्या देशी दारु विक्रीमुळे या भागात नेहमी दशहतच असते. या भागातून जाणाऱ्या नागरीकांना अनेकदा त्रास होतो.…
मतदारांवर आम्ही उमेदवार लादणार नाही-अमिता चव्हाण
नांदेड(प्रतिनिधी)-भोकर विधानसभा मतदार संघाचा आमदारकीचा राजीनामा अशोक चव्हाण यांनी दिलेल्यानंतर ही जागा आता रिक्त झाली आहे. याा जागेवर कोण येणार…