इतवारा भागात पाच दिवसापुर्वी खून करणारा मारेकरी पकडला; खूनी 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा भागातील चुन्ना भट्टी रस्त्यावर 30 ऑक्टोबर रोजी तु मला भाव देत नाहीस म्हणून तुला जगण्याचा अधिकार नाही असे सांगत एका 24 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला इतवारा पोलीसांनी पकडल्यानंतर 10 व्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यास 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
30 ऑक्टोबरच्या रात्री चुन्नाभट्टी रस्त्यावरून मोहम्मद अरबाज अब्दुल मोबीन (24) हा युवक जात असतांना अब्दुल अलमास उर्फ बबलू अब्दुल गफूर (33) हा बीऍन्डसी कॉलनी चैतन्यनगर येथे राहणारा व्यक्ती तेथे थांबलेला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या मोहम्मद अरबाजला अब्दुल अलमास उर्फ बबलू याने जवळ बोलावले आणि तु मला भाव देत नाहीस, मला भित नाहीस, गल्लीतील सर्व मुले मला भितात, मला भाव देतात अशा परिस्थितीत तु ते करत नाहीस म्हणून तुला जगण्याचा अधिकार नाही असे सांगत बबलूने मोहम्मद अरबाजच्या शरिरावर चाकूने अनेक जागी वार केले, पोटा खंजीर खुपसला या हल्यात मोहम्मद अरबाज अब्दुल मोबीन (24) हा युवक मरण पावला. 31 ऑक्टोबर रोजी मयत मोहम्मद अरबाजचे वडील अब्दुल मोबीन अब्दुल रशिद यांनी दिलेल्या तक्रारीवरुन इतवारा पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 506 आणि भारतीय शस्त्र कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांना देण्यात आला होता.
6 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास खून करणारा अब्दुल अलमास उर्फ बबलू अब्दुल गफुर (33) यास पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, इतवाराचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरिक्षक शेख असद, रहिम चौधरी, पोलीस अंमलदार मोहन हाके, नजरेआजम देशमुख, संघरत्न गायकवाड, हबीब चाऊस , काकासाहेब जगताप, अमोल भोकरे यांनी पकडले. आज दुपारी पोलीस उपनिरिक्षक शेख असद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बबलूला न्यायालयात हजर करून तपासाला न्याय देण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता मागली. 10 व्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी मारेकरी बबलुला 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशीकांत महावरकर, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी इतवारा पोलिसांचे कौतुक केले आहे.
संबंधीत बातमी..

https://vastavnewslive.com/2023/11/01/देगलूर-नाका-परिसरात-युवक/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *