नांदेड(प्रतिनिधी)-दोन गटांनी आपसात केलेल्या मारहाणीनंतर एका गटातील युवकाचे डोके फुटले त्यानंतर त्यांनी एक दुसऱ्यावर दगडफेक करून दहशत माजवली. इतवारा पोलीसांनी या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सोमनाथ भारत यादव या 27 वर्षीय युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार 9 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास तो नावघाट येथील पाण्याची पातळी पाहुन घराकडे येत असतांना धनु वाघमारे यांच्या घराच्या समोरील गल्लीत त्याच्या ओळखीचे असलेले चेतन चंदर लंकाढाई, राजन लंकाढाई दोघे रा.किल्ला रोड, कृष्णा मिठूलाल मंडले रा.होळी आणि सागर भातावाले रा.सराफा नांदेड या चौघांनी तु या गल्ली का आलास असे सांगून वाद घातला आणि त्यापैकी चैतनने लोखंडी गजाळी माझ्या डोक्यात मारुन जखमी केले. इतर तिघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. या दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीदरम्यान त्यांनी एक दुसऱ्यावर दगडफेकपण केली होती. एक दुचाकी गाडी तोडून टाकली अशा प्रकारे दहशत निर्माण केली. इतवारा पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 222/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 323, 504, 506 आणि 34 नुसार दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
एक दुसऱ्यावर दगडफेक करून दहशत माजविणाऱ्या दोन गटांमधील एका गटातील चार युवकांवर गुन्हा दाखल