नांदेड, (प्रतिनिधी)- किनवट परिसरात पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुर्ण क्षमतेने नदी भरुन वाहत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीत येणारे पाण्याचे प्रमाण लक्षात घेता स्वाभाविकच पैनगंगेचे पाणी किनवटच्या नदी जवळील सखल भागात घुसले आहे. या भागातील 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून प्रशासनातर्फे या लोकांना अन्नाची पाकिटे व इतर व्यवस्था केली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी दिली. आज सकाळ पासून नांदेड-किनवट हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
Related Posts
कोरोनाची सोमवारी सुट्टी; उपचार घेणारे रुग्ण आज फक्त चार
नांदेड(प्रतिनिधी)- आज कोरोना विषाणूने एकही नवीन रुग्ण दिलेला नाही.आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 04 आहे.कोरोना बाधेतून मुक्त होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी…
थेट कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड 15 मार्चला होणार
नांदेड (प्रतिनिधी) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) कार्यालयामार्फत प्रकल्प मर्यादा रुपये थेट कर्ज योजनेसाठी 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थी निवड…
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेची धर्माबादमध्ये क्रिकेट सट्ट्यावर धाड
नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबादच्या नवा मोंढा भागात 23 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या विशेष पथकाने धाड टाकून क्रिकेट जुगार चालविणाऱ्या एकाला पकडले आहे.…