नांदेड,(प्रतिनिधी)- ‘गाण्यांची अंगत-पंगत’या कार्यक्रमाच्या रसिक सदस्य आणि श्री माणिक गुमटे यांच्या सुविद्य पत्नी सौ. मधुमती गुमटे यांचे नुकतेच ह्र्दय विकाराच्या धक्क्याने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 62 वर्षांचे होते. मालेगाव रोडवरच्या भवितव्य नगर येथे रहाणार्या मधुमती गुमटे म्हणजे गुमटे परिवार आणि सर्व नात्यांतले एक हसमुख आणि रसिक असे व्यक्तीमत्त्व होते. आजाराला व्यवस्थित तोंड देऊन त्यांची प्रकृती चांगली झालेली असताना हा दु:खद प्रसंग गुमटे परिवारावर ओढवला. सिने संगीत मधुमती यांचा आवडीचा विषय होता. गाण्यांची अंगत-पंगतच्या वतीने नुकताच साजर्या झालेल्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात त्यांनी गाण्याच्या निमित्ताने निवेदनेही केलेली होती. आपले पती माणिक गुमटे यांच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या मागे पती माणिक गुमटे, दोन कन्या सौ. रश्मी, सौ.मेघना आणि जावई कुणाल, तुषार यंदे आणि आप्तेष्ट परिवार आहे.
Related Posts
वैज्ञानिक कुतूहल जोपासण्यासाठी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन एक प्रभावी माध्यम- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
49 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ग्रामीण टेक्निकल कॅम्पसमध्ये थाटात उद्घाटन नांदेड (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला वाव देण्यासाठी तसेच वैज्ञानिक…
दोन महिला दोन पुरूषांना 700 रुपये रोख दंड आणि कोर्ट उभेपर्यंतची शिक्षा
नांदेड(प्रतिनिधी)- एका महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण करणाऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली बिरहारी-जगताप यांनी कोर्ट उभेपर्यंत शिक्षा आणि प्रत्येकी 700 रुपये…
मनपाची परवानगी न घेता अधिक श्रावण मास शिवनाम सप्ताहाचे बॅनर लावले; गुन्हा दाखल ; ही पहिली आणि शेवटी कार्यवाही ठरू नये हीच अपेक्षा
नांदेड(प्रतिनिधी)-अधिक श्रावण मास अखंड शिवनाम सप्ताहाचे बॅनर बिना परवानगी लावले या कारणावरुन महानगरपालिकेेने बॅनर लावणाऱ्यांविरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…