गुडगुडीचे नाव बदलून लॉटरी झालेला जुगार जोमात

नांदेड(प्रतिनिधी)-शहराच्या पश्चिम दिसेला सगळ्यात शेवटी असलेल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुडगुडी नावाचा जुना जुगार संगणकीय पध्दतीत लॉटरीच्या नावाखाली सुरू करण्यात आला आहे.
गुडगुडी हा जुगार अत्यंत जुन्या पध्दतीचा जुगार मानला जातो. त्यामध्ये एका डब्यात लाकडी गोटी ठेवून ती हलवून स्थिर केली जाते आणि जो क्रमांक वर दिसत असेल तो जिंकला असा त्याचा निर्णय आहे. सध्याच्या तांत्रिक युगात यात बदल करून संगणकामध्ये ही गुडगुडी आली आहे. त्याला नवीन नाव लॉटरी असे देण्यात आले आहे. या लॉटरीचे अनेक दुकान नांदेड शहरातील पश्चिम भागात असलेल्या शेवटच्या पोलीस ठाण्यात सर्वाधिक आहेत. या पोलीस ठाण्याकडे कार्यक्षेत्र मोठे आणि मनुष्यबळ छोटे असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी सुध्दा या भागाकडे जास्त लक्ष देत नसतात. एकूणच गुडगुडी नावाच्या जुगाराचे संगणकीय रुपांतरण लॉटरी चालविण्यात आता सर्वांना मोठा रस तयार झाला आहे. महाभारतातील जुगारापासून आजपर्यंतचा ईतिहास पाहिला तर त्यात खेळणारा कधीच जिंकत नाही खेळ करणारा जिंकतो हे 100 टक्के खरे आहे, असेच येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *