चंद्रकला बोधगिरे यांना सेवा निवृत्त बद्दल निरोप, जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

 

अर्धापूर,(प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत सहशिक्षक म्हणून प्रदिर्घ सेवा करून निवृत्त झाल्या बद्दल शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या वतीने भावपूर्ण वातावरणात शनिवारी (ता ३१) निरोप देण्यात आला.या निरोप समारंभात बोधगिरे यांच्या सेवा काळातील शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला.

शहरातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील सहशिक्षिका चंद्रकला बोधगिरे ह्या प्रदीर्घ सेवा केली आहे.त्या निवृत्त झाल्याने शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सय्यद मंजुरी आली होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त मुद्रांक शुल्क उपजिल्हाधिकारी शिवराम बोधगिरे, शिक्षण विस्तार अधिकारी लोकडाजी गोडबोले, सारिका सुरेवाड, सुचिता बोधनवाड,उमेश बोधगिरे,रोहित बोधगिरे, मुख्याध्यापक डॉ शेख, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत मुळें, मधुकर उन्हाळे आदि उपस्थित होते.

शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या वतीने भेट वस्तू देवून गौरव करण्यात आला.यावेळी मनोगत व्यक्त करताना बोधगिरे म्हणाले की, उच्च शिक्षण घेऊन आपले भवितव्य उज्ज्वल घडवता येते.आपल्या कामात प्रामाणिकपणा, सचोटी ठेवून अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते असे मत व्यक्त केले.तर सेवा काळात सर्व सहकारी शिक्षक, अधिकारी व कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभले.त्यांच्या सहकार्याने माझा सेवा काळ चांगला गेला आशा भावना चंद्रकला बोधगिरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पांढरे यांनी केले तर प्रास्ताविक शिवाजी मेलदोडे यांनी केले तर आभार वैजनाथ हंगरगेकर यांनी मानले.या निरोप समारंभास शिक्षक, विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *