जय जिजाऊ, जय शिवराय घोषणांनी नांदेड दुमदुमले..

नांदेडमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात ढोल ताशांच्या गजरात लाखो शिवभक्तांनी भक्तीमय वातावरणात साजरा केला. शिवजन्म पुर्वसंध्येला नांदेड येथील महिला मंडळांनी शिवज्योत रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिषबाजी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त नांदेड शहरात सकाळपासूनच विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. सकाळी 9.30 वाजेच्यासुमारासस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवप्रेमींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विविध सामाजिक, राजकीय व स्वयंसेवी संघटनेनी शहरा व सिडको परिसरात जागोजागी अन्नदान व रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी वेळी पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नवा मोंढा येथे मराठा सेवा संघाच्यावतीने सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी शिवचारित्र्यावर व्याख्यान दिले. या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, महापालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे, मराठा सेवा संघाचे कामाजी पवार, जिजाऊ बिग्रेडच्या असंख्य महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या.दुपारी 3 वाजेच्यानंतर शहरातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात ढोल-ताशे व डि.जे.च्या गजरात मिरवणूका निघाल्या होत्या. या मिरवणूका रात्री उशीरापर्यंत शांतते सुरूच होत्या. सकाळपासूनच नांदेड शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *