नांदेड (प्रतिनिधी)- दिवाळी व इतर सणांच्या कालावधीत प्रवासी मोठया प्रमाणात गावी येत व जात असतात. अशा कालावधीत शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिक भाडे प्रवासी बस धारकामार्फत घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. 26 ऑक्टोबर 2021 रोजीच्या राज्य महामंडळाच्या भाडेदराच्या तुलनेत कंत्राटी परवाना वाहनांना कि.मी.प्रमाणे भाडे निश्चित करण्यात आले आहे. कंत्राटी वाहतुकदार प्रवासी भाडयापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाच्या ईमेल dycommr.enf2@gmail.com व rto.26-mh@gov.in वर तक्रार नोंदवावी. त्यामध्ये आपले नावे, मोबाईल क्रमांक, तिकीट, प्रवासाचा तपशील याची माहिती देण्यात यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.
Related Posts
भारत जोडो यात्रेत पोलीसांच्या मेहनतीची दखल आवश्यक
राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत नांदेड पोलीसांनीच नव्हे तर ज्या-ज्या ठिकाणातून ती यात्रा नांदेडला आली आणि पुढे कश्मिरपर्यंत जाणार आहे.…
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन युवकांवर जीवघेणा हल्ला;गंभीर घटना असताना पोलीस निरिक्षकांचा प्रतिसाद मात्र सूर्योदयानंतर
नांदेड, (प्रतिनिधी)- शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहसीन कॉलनी, देगलूर नाकाजवळ 1 डिसेंबरच्या रात्री 1.30 वाजता पाच-सहा जणांनी तीक्ष्ण…
पोलीस उपनिरीक्षक आणि अंमलदारांनी मातेला दिले जीवदान
नांदेड,(प्रतिनिधी)- पोलीस विभागाचे नाव ऐकताच आणि त्यातील व्यक्तिमत्व पाहत असताना प्रत्येकाचा थरकाप उडतो. परंतु या पोलिसांच्या खाकी वर्दी मध्ये सुद्धा…