नांदेड ( जिमाका ):- नांदेडच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा सोमवारी प्रवीण टाके यांनी पदभार स्वीकारला. प्रवीण टाके हे नागपूर येथून नांदेड येथे या पदावर रुजू झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने काढलेल्या बदली आदेशानंतर यापूर्वीचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे नागपूर येथे रुजू झाले आहेत. त्यांच्या जागेवर प्रवीण टाके यांनी आज पदभार सांभाळला. प्रवीण टाके यांनी यापूर्वी नवी दिल्ली, मुंबई, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी व समकक्ष पदावर काम केले आहे. यापूर्वी लोकमत, सामना तरुण भारत, नागपूर पत्रिका आदि वृत्तपत्रांमध्ये पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले प्रवीण टाके एक प्रतिभावान कवी,लेखक असून त्यांची फकीर ही कादंबरी प्रकाशित आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर त्यांनी स्तंभलेखन केले आहे.
Related Posts
महासंस्कृती मेळाव्यात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर काढण्यात आलेल्या विविध रांगोळी….
महासंस्कृती मेळाव्यात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर काढण्यात आलेल्या विविध रांगोळी….
62 व्या महाराष्ट्र राज्य हौसी मराठी नाट्य स्पर्धेला प्रारंभ
▪️ज्येष्ठ रंगकर्मी राजीव किवळीकर यांच्याहस्ते उद्घाटन ▪️जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती २ डिसेंबर…
सिकलीगर समाजाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान
नांदेड (प्रतिनिधी)-सिकलीगर समाजाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून राष्ट्रीय सिख सिकलीगर समाजाचे ग्यानी तेजासिंघ बावरी यांनी विविध मागण्या त्यांच्यासमोर…