नांदेड (प्रतिनिधी) – गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 166 बाधित गावात सद्यस्थितीत 1 हजार 982 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. आजवर 74 पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने बाधित गावासह पाच किमी परिघातील इतर 822 गावांवर विशेष लक्ष दिले असून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 19 हजार 183 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 31 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.
Related Posts
पत्रकार भवनाच्या निधीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या पत्रकारांवर कार्यवाही करा-ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे पत्रकार भवन न उभारता फसवणूक करणाऱ्या पत्रकार संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी असे एक पत्र ज्येष्ठ पत्रकार अनिकेत…
बिलोली देगलूर रस्त्यावर घडली लुट
नांदेड(प्रतिनिधी)-दोन जणांनी बिलोली-देगलूर रस्त्यावर खतगाव पाटीजवळ आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून एका व्यक्तीकडून 40 हजार रुपयांचा ऐवज बळजबरी लुटला…
..नाही तर अशोक चव्हाणांना मोठे उत्तर राज्यात द्यावे लागेल-आ.प्रशांत बंब
नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी आता तरी माझ्या तक्रारींवर अत्यंत त्वरीत प्रभावाने दखल घेवून चौकशी करावी. कमीत कमी…